Pune Flights Disrupted: दिल्लीतील प्रतिकूल हवामानामुळे पुण्यातील 11 उड्डाणे रद्द; प्रवाशांची गैरसौय
Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

Pune Flights Disrupted: 14 जानेवारी रोजी प्रतिकूल हवामानामुळे वारंवार होणारी अनपेक्षित उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. पुणे विमानतळावर (Pune Airport) रविवारी प्रतिकूल हवामानामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या एकूण 11 उड्डाणे रद्द करण्यात आली. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या म्हणण्यानुसार, दिल्ली विमानतळावरील दाट धुक्यामुळे रविवारी पुण्याहून दिल्लीकडे जाणारी राजकोट, प्रयागराज आणि अहमदाबादसह 11 उड्डाणे रद्द करण्यात आली.

या अनपेक्षित फ्लाइट रद्द झाल्यामुळे, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. एका प्रवाशाने फ्लाइटच्या उशीराबद्दल असमाधान व्यक्त करत X वर यासंदर्भात पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये प्रवाशाने म्हटलं आहे की, पुणे विमानतळावर 250 हून अधिक प्रवासी दिल्ली फ्लाइटसाठी 8 तासांपेक्षा जास्त प्रतीक्षेत आहेत. (हेही वाचा - Viral Video: प्रवाशाने इंडिगोच्या पायलटच्या नाकावर मारली ठोस , नेमकं काय घडलं?)

प्रवाशांनी एअरलाइनकडून मिळालेल्या अपुरा अल्पोपहार आणि खराब संवादावर संताप व्यक्त केला. तथापी, X वरील दुसर्‍या एका महिला प्रवाशाने इंडिगो एअरलाइन्सने फ्लाइट रद्द केल्याने आणि सण (लोहरी) खराब केल्याबद्दल निराशा व्यक्त केली. तिने पुणे विमानतळावरील ग्राहक सेवेवर टीका केली. (हेही वाचा - Delhi-Toronto Air India Flight: 4 लाखांचे तिकीट घेतले तरीही विमानात मिळालं तुटलेलं सीट; व्हिडिओ शेअर करत महिलेने केला खुलासा, पहा)

दरम्यान, रविवारी दिल्लीत पहाटे 3 ते 10.30 वाजेपर्यंत तीव्र धुक्याचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे दिल्ली विमानतळावर 20 उड्डाणे वळवावी लागली. 400 हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. धुक्याच्या प्रभावामुळे रविवार हा हंगामातील सर्वात थंड दिवस म्हणून नोंदला गेला. या दिवशी किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. मात्र, दुपारनंतर उन्हामुळे थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.