औरंगाबाद मध्ये जायकवाडी धरणावर (Jayakwadi Dam) गुप्तचर विभागाकडून देण्यात आलेल्या इशार्यानंतर आज ( 25 ऑगस्ट) सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पर्यटकांनाही जायकवाडी धरण परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आज काही वेळापूर्वी अचानक पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली होती.
औरंगाबादमध्ये काही दिवसांपासून हाय अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. सध्या जायकवाडी धरण 90% भरलेले आहे. मात्र हाय अलर्ट जाहीर झाल्याने आता धरणावर 12 सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सोबतच 24 तास खडा पहारा ठेवला जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी मुंबई-दिल्लीसह प्रमुख शहरात हाय अलर्ट; विमानतळ, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षतेत वाढ
जायकवाडी धरणाच्या सांडव्यावर आकर्षक विद्युत रोषषाई असते. ती पाहण्यासाठीदेखील अनेक पर्यटक येतात. मात्र ही रोषणाई देखील काढून टाकावी असे आदेश पोलिसांकडून जायकवाडी प्रशासनाला देण्यात आले आहेत अशी माहिती आहे. मुख्य गेट व इतर सर्व गेटवर ओळखपत्राची खात्री झाल्याशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये. पर्यटकास धरणाच्या भिंतीवर जाण्यास प्रतिबंध करून त्यांना गेटवरच अडवण्यात यावे. असेही सांगण्यात आले आहे.