औरंगाबाद येथील सिडको वसाहती आज (3 डिसेंबर) सकाळी घुसलेल्या बिबट्या अखेर सहा तासाहून अधिक वेळाच्या शोधकार्यानंतर जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकार्यांना यश आलं आहे. प्रसंगावधान राखत जाळीमध्ये अडकवून बिबट्याला पकडण्यात यश आलं आहे. औरंगाबाद शहरातील उच्चभ्रू भागात असलेल्या सिडको Cidco N1 परिसरात बिबट्या पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. औरंगाबाद: Cidco N1 परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचंं वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू
दरम्यान मानवी वस्तीमध्ये बिबट्या आढळल्याची ही पहिली घटना नव्हे. यापूर्वी ठाणे, विक्रोळी परिसरात अशाप्रकारे बिबट्या सोसायटी, मॉल सारख्या रहदारीच्या, वर्दळीच्या ठिकाणी दिसला होता. त्यावेळेस वन विभागाने अशाप्रकारेच शिताफीने बिबट्याला जेरबंद केलं होतं.