कोल्हापुरात ख्रिश्चनांच्या प्रार्थनासभेवर हल्ला प्रकरणी संशयितांचा शोध सुरु
ख्रिश्चन प्रार्थना सभेवर हल्ला | प्रातिनिधिक फोटो (File Photo)

कोल्हापुरात (Kolhapur)  एका प्रार्थनासभेवर (Prayer Mass) ख्रिसमसच्या काही दिवस आधी हल्ला करण्यात आल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. 10-15 अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 12 लोक जखमी झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुर जवळ 100 किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये भाड्याच्या खोलीत प्रार्थनासभेचं  (Prayer Mass) आयोजन केल होतं. दरम्यान काही अज्ञात लोकांनी हॉकी स्टीक, काचेच्या बाटल्या, दगड आणि सुऱ्यांनी हल्ला केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Deputy SP Anil Kadamयांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांना शोधण्यासाठी पोलिसांनी 5 टीम बनवल्या आहेत. हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या 10-15 लोकांना शोधण्यासाठी या टीमला कर्नाटक, बेळगाव या भागामध्ये पाठवण्यात आलं आहे.

 

काही दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करणारे ट्विट केले होते. कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कोवाड गावात एका प्रार्थनासभेवर हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.