Ganpat Gaikwad Atrocity Case: भाजप आमदार गणपत गायकवाड विरोधात  अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
MLA Ganpat Gaikwad | (Photo Credits: Facebook)

कल्याणचे भाजप आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांच्या अडचणीत वाढ होत आहे. शिवसेना नेता महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी  पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यानंतर आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल (Atrocity Case) करण्यात आलं आहे. द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा -  MLA Ganpat Gaikwad: उल्हासनगर गोळीबार प्रकरण, गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी)

उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहूल पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आली. आमदारांसह आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात 31 जानेवारी रोजी जागेवरुन वाद झाला होता. जागा मालकाच्या कुटुंबियांसोबत भाजप आमदार गायकवाड यांचा वाद झाला होता. या प्रकरणात भाजप आमदारासह आठ जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा जागा मालकाच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे.