रात्रीच्या अंधारात दुष्काळ पाहणी करणे ही दुष्काळग्रस्तांची थट्टा- अशोक चव्हाण
खा. अशोक चव्हाण (Photo Credit: PTI)

रात्रीच्या अंधारात दुष्काळग्रस्तांची पाहणी करणे ही दुष्काळग्रस्तांची थट्टाच आहे. परंतु, रात्रीच्या अंधारात दुष्काळाची पाहणी करणारे मंत्री नेमके पाहणी करतायत की उमेदवार शोधत शोधतायत, असा टोला काँग्रेस नेते खासदार अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला लगावला आहे. सरकारला दुष्काळग्रस्तांशी काही घेणंदेणं नसून या घटनेतची फक्त औपचारिकता केली जात आहे , अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी केलीआहे.

दरम्यान, दुष्काळी उपाययोजनांकरिता जिल्हाधिकाऱ्यांना 25 कोटींपर्यंत खर्चाचे अधिकार द्यावेत. तर दिवसेंदिवस वाढत चालेल्या चारा टंचाईवर योग्य तो तोडगा काढावा असेही चव्हाण म्हणाले, ते हदगावातील जाहिर सभेत बोलत होते.  पुढे बोलताना चव्हाण म्हणाले,  मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत घोषणा केल्या आहेत. त्यांची श्वेतपत्रिका काढावी. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा करुन तीन महिने पूर्ण झाले आहेत. तरीही यावर कोणते ही पावले उचलली गेली नाही आहेत. त्यामुळे समाजाकडून आंदोलने केली जातात ते गुन्हेगार नसून उलट तरुणांवर गुन्ह्याची टांगती तलवार ठेवली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भुजबळांना मनुस्मृती आणि सरकारला विरोध करणाऱ्यांवर दडपशाही आणली जात आहे. तर दाभोळकर कुलबुर्गी यांच्या हत्येसंबंधित सरकार कोणतीच भूमिका का पार पाडत नाही आहे असा सवालही चव्हाण यांनी या वेळी उपस्थित केला.

दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी भूमिकाही चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.