लंडनस्थित बारामतीकर Arya Taware चा  Forbes 30 Under 30 मध्ये समावेश;  युरोपीय व्यक्तींमध्ये एकमेव आशियाई वंशाची तरुणी
Aarya Tawre | PC: Twitter

मराठीचा डंका जगभरात पोहचवणार्‍या परंपरेमध्ये आता महाराष्ट्रातील मूळच्या बारामती मधील आर्या तावरे (Arya Taware) चा देखील समावेश झाला आहे. आर्याचा समावेश फोर्ब्सच्या आर्थिक क्षेत्रातील Forbes 30 Under 30 च्या यादीत समावेश झाला आहे. सध्या आर्या लंडन मध्ये असली तरीही ती मूळची बारामतीची आहे. आर्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे यांची लेक आहे. आर्याने 22 व्या वर्षी 'स्टार्टअप' सुरू करून ब्रिटनमधील लघू व मध्यम बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून दिला आहे.

आर्याचे शालेय शिक्षण बारामती मध्ये झाले पुढे ती लंडन मध्ये उच्च शिक्षणासाठी गेली. अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट अँड फायनान्स मध्ये तिने शिक्षण घेतले. नोकरी करताना तेथील बांधकाम व्यावसायिकांना निधी उभारणीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्याचा अभ्यास करत तिने स्वतःची स्टार्ट अप कंपनी सुरु केली. नक्की वाचा:  Raju Kendre On Forbes 2022 List: शेतकऱ्याचं पोरगं फोर्ब्सच्या यादीत झळकलं, बुलडाण्याचा राजू केंद्रे याची उत्तुंग भरारी.

रोहित पवारांकडून कौतुक

अंकिता पाटील ठाकरे कडून अभिनंदन

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे

लंडन मध्ये शिकताना विद्यापीठातून उत्तीर्ण झाल्यावर आर्याने 'फ्युचरब्रिक्स' नावाची 'स्टार्टअप' कंपनी सुरू केली. या 'स्टार्टअप'च्या माध्यमातून यूकेमधील लघू व मध्यम बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून दिला जातो. 'आर्याच्या स्टार्टअप कंपनीचे मूल्य साडेतीनशे-चारशे कोटींवर आहे. फोर्ब्सच्या यादीत युरोपीय व्यक्तींमध्ये ती एकमेव आशियाई वंशाची तरुणी आहे.