Antilia Bomb Scare Case: अँटिलिया स्फोटके प्रकरणात नरेश गौर यास जामीन; एनआयएला धक्का
Mansukh Hiren | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अँटिलिया स्फोटके प्रकरण (Antilia Bomb Scare Case) आणि मनसुख हिरण हत्या (Mansukh Hiren murder case) प्रकरणी एनआयएला धक्का बसल्याचे मानले जात आहे. या दोन्ही प्रकरणातील एक आरोपी नरेश गौर (Naresh Gaur) यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने विशेष एनआयए कोर्टाचा स्थगिती आदेशही रद्द केला. दशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणात जामीन मिळालेला नरेश गौर हा पहिलाच आरोपी आहे.

नरेश गौर याला एनआयए कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र, त्या आदेशाताल 25 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. या स्थगितीला नरेश याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने गोर याच्या याचिकेवर सुनावणी करत एनआयए कोर्टाची स्थगिती रद्द केली. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे गौर याला मोठा दिलासा. तर एनआयएला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. (हेही वाचा, Antilia Bomb Scare Case: अँटिलिया स्फोटक प्रकरणी नवाब मलिक यांचा सूचक इशारा म्हणाले, 'आणखी धक्कादायक माहिती बाहेर येणार')

नरेश गौर हा अँटिलिया स्फोटके प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. या प्रकरणात मनसुख हिरण याचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र, अत्यंत संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू झाला. त्याची हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणात गौरव याच्यावर सिम पुरवठा करणे आणि केलेल्या कटात सहभागी होणे असा आरोप आहे. या प्रकरणात सचिन वाझे हा मुंबई पोलिस दलातील बडतर्फ अधिकारी प्रमुख आरोपी आहे.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील निवासस्थान अँटिलिया बाहेर जिलेटीनच्या कांड्या भरलेली एक एसयूव्ही आढळून आली होती. ही एसयुव्ही मनुसख हिरेन यांच्या नावावर होती. जिलेटीनच्या कांड्या ठेवल्याचे पुढे येताच या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएचा प्रवेश झाला. दरम्यन, मनसुख हिरेन यांचा 5 मार्च 2021 या दिवशी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील खाडीत मृतदेह सापडला. त्यामुळे या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला.