शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी आमदारांना 100 कोटींची ऑफर देऊन फसवणूकीचा कट Mumbai Police Crime Branch ने उधळला; 4 जण अटकेत
Arrest । Image Used For Representational Purpose (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाले असले तरीही अद्याप मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्यामुळे अनेक आमदारांची मंत्रिपदं गळ्यात पडावी यासाठी मोर्चेबांधणी, शक्तिप्रदर्शनं सुरू आहेत. आमदारांमधील या आशा-आकांक्षांना खतपाणी घालत 100 कोटींच्या बदल्यात मंत्रिपद देऊ असा व्यवहार करत आर्थिक फसवणूकीचा डाव समोर आला आहे. दरम्यान Anti-Extortion Cell कडून या मध्ये 4 जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

मुंबई पोलिस क्राईम ब्रांच च्या माहितीनुसार, राहुल कुल सह 3 भाजपा आमदार मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्याच्या बदल्यात 100 कोटी या ऑफर मध्ये गळाला लागले होते. पण यामध्ये पोलिसांना रियाझ शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवाई, जाफर उस्मानी या चौघांना अटक झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस! शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत, राजकीय ओबीसी आरक्षणावर सुनावणी .

मीडीया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी आमदार आणि भामट्यांमध्ये ऑबेरोय हॉटेल मध्ये भेट झाली. या भेटीत आरोपींनी आपण दिल्लीतून आल्याचं सांगितलं. वरिष्ठांनी बायोडाटा मागितला आहे. मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल र 100 कोटी रुपये द्यावे लागतील. यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी लागेल असेही सांगितले. दरम्यान एका आमदाराच्या खाजगी सचिवाला संशय आला आणि त्याने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील कारवाई केली. पुढे पोलिसांनी सापळा रचून अँटी एक्स्टॉर्शन सेलने आरोपींना पकडले आहे.