No Kissing Zone in Mumbai: मुंबईत 'या' ठिकाणी 'नो किसिंग झोन'ची घोषणा, प्रेमीयुगुलांचे भररस्त्यात चालायचे अश्लील चाळे
No Kissing Zone (Photo Credit: BlueStreakFreaks Twitter Account)

मुंबईसारख्या (Mumbai) लोकसंख्येने गजबजलेल्या शहारात अनेक ठिकाणी नो हॉर्न, सायलेन्ट झोन, नो पार्किग झोन असे लिहलेले अनेक फलक वाचले असतील. परंतु, मुंबईच्या बोरिवलीतील (Borivali) जॉगस पार्क येथे स्थानिक नागरिकांकडून घोषीत करण्यात आलेल्या आगळ्या-वेगळ्या झोनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या परिसरात काही जोडपे अश्लील चाळे करण्यासाठी येतात. त्यांच्या अश्लील कृत्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा जोडप्यांना चाप बसवण्यासाठी नागरिकांनी जॉगर्स पार्क परिसरातील रस्त्यावर 'नो किसिंग झोन' (No Kissing Zone) लिहिले आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, बोरिवलीच्या चिकुवाडीतील सत्यम शिवम सुंदरम सोसायटी आहे. याच सोसायटीजवळ जोगर्स पार्क आहे. या ठिकाणी अनेक नागरिक व्यायाम करायला आणि फिरायला येत असतात. याचबरोबर या पार्कमध्ये लहान मुलेही खेळायला येतात. पंरतु, कोरोना महामारीपासून या परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर अधिकच वाढला आहे. जोडपे दुचाकी किंवा कारमध्ये येऊन अश्लील चाळे करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या त्रासाला वैतागून आणि अश्या जोडप्यांना पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावरच 'नो किसिंग झोन' अस लिहिले आहे. विशेष म्हणजे जॉगर्स पार्क परिसरात नो किसिंग झोनची घोषणा केल्यापासून अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याने इकडे येणे थांबवले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. हे देखील वाचा- Mumbai Suicide Case: मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याने केरळमधील तरुणाचा मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांना कळताच वाचवला जीव

याशिवाय, अहमदनगर येथील ऐतिहासिक, धार्मिकस्थळ म्हणून ओळख असणारे डोंगरगण गाव व परिसर प्रेमीयुगुलांसाठी लव्हर पॉइंट बनले आहे. या विभागात राहणारे नागरिकदेखील जोडप्यांच्या अश्लील चाळ्यांनी त्रस्त झाले आहे. यामुळे या ठिकाणी पोलिसांनी संबंधित प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. अहमदनगर शहरापासून हे ठिकाण अवघ्या 15 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी सहज कोणीही पोहचू शकते. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमीयुगुलांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये कॉलेज तरुण तरुणींची संख्या जास्त आहे. डोंगर टेकडी, खोल दरी, घनदाट जंगल यामुळे जोडप्यांना एकांत मिळतो. अशा वातावरणात प्रेमीयुगुलांची अश्लील चाळे सुरु असतात. त्याचा परिणाम येथे येणार्‍या पर्यटकांवर देखील होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.