Nitesh Rane and Uddhav Thackeray: 'अनिल परब मातोश्रीचे कारकून, उद्धव ठाकरे..'; नितेश राणे यांची जीभ घसरली
Nitesh Rane On Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिवसेना (Shiv Sena) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जीभ घसरली आहे. अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टीका करताना नितेश यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. या वेळी त्यांनी अतीशय तीव्र शब्द वापरले. अनिल परब यांचा उल्लेख मातोश्रीचा (Matoshree) कारकून असा करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना नामर्द म्हटले. म्हाडाने अनिल परब यांच्या कार्यालयावर केलेल्या कथीत कारवाईबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता नितेश राणे बोलत होते. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारांबद्दल टीका होत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या काहीच करण्याची हिंमत नाही. ते नामर्द आहेत. त्यामुळे त्यांना अनिल परब यांच्यासारखे कारकून लागतात. जे दुसऱ्यांची घरे पाडतात. त्यासाठी नोटीस देतात. त्यांच्यावरही कधीरी अशीच कारवाई होते, असे नितेश राणे म्हणाले. तसेच, नारायण राणे यांच्या बंगल्यातील बांधकाम पाडल्याची पाहणी करण्यासाठी अनिल परब येणार असतीत तर त्यांनी येऊन दाखवाववे. त्यांचा पाहूणचारआम्ही योग्य पद्धतीने करु, असेही राणे म्हणाले. (हेही वाचा, Nitesh Rane On Ajit Pawar: आमदार नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार, ट्विट करत साधला निशाणा)

दरम्यान, अनिल परब तोब बस झांकी है, मातोश्री अभीबाकी है.. असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. मातोश्री-2 हे पुढचे लक्ष्य असणार आहेत. मातोश्री 2 वर शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याला प्रवेश नसतो. त्याची चौकशी होईल तेव्हा अनेक गोष्टी पुढे येतील, असेही नितेश राणे म्हणाले.