अंधेरी: Child Porn शेअर करणाऱ्या भाजी विक्रेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक
. Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: File Image)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  केलेल्या कारवाईत चाईल्ड पॉर्न (Child Porn) शेअर करण्याच्या आरोपातून अंधेरी (Andheri) मधील एका भाजी विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. हरिप्रसाद पटेल (Hariprasad Patel) असं आरोपीचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चा रहिवाशी असून अंधेरीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो.हरिप्रसाद याने यापूर्वीही चाईल्ड पॉर्नचे व्हिडीओ फेसबुकवरून अपलोड केले होते. वर्षभरापूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचे फेसबुक अकाऊंट बंद केले होते. मात्र, हरिप्रसादने मित्राच्या मोबाईलवरून नवीन फेसबुक अकाऊंट सुरू केलं आणि मग चाईल्ड पॉर्नचा व्हिडीओ शेअर केला. दुसऱ्यांदा ही चूक करताच हरिप्रसादला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे: Child Pornography चे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या तिघांना अटक; खडक पोलिसांची कारवाई

प्राप्त माहितीनुसार, फेसबुकवरून मोठ्या प्रमाणात चाईल्ड पॉर्न शेअर केले जात आहे. याविरोधात फेसबुकनेच मोहीम उघडली असून, चाईल्ड पॉर्न शेअर करणाऱ्यांची माहिती फेसबुक पोलिसांना देत आहे. याच पार्श्वभूमीवर मुमबी पोलिसांकडून देखील अशा प्रकारात संसषयी आढळणार्यावर कडा पहारा देण्यात येत आहे. अगोदरच एकदाया प्रकरणात गुंतलेल्या हरीप्रसाद हा देखील म्ह्णूनच पोलिसांच्या लिस्ट मध्ये होता, यावेळेस पुन्हा एकदा तो पॉर्न शेअर करण्यात दोषी आढळल्याने पोळी कठोर कारवाई करणार असल्याचे समजतेय.

दरम्यान काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेनं भारताला चाईल्ड पॉर्नसंबंधी धक्कादायक आकडेवारी दिली होती. भारतात गेल्या पाच महिन्यात चाईल्ड पॉर्नशी संबंधित 25 हजार व्हिडीओज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आले आहे. या अहवालातून मुंबई, ठाणे आणि पुण्यात चाईल्ड पॉर्नची सर्वात जास्त प्रकरणं समोर आली आहे. फक्त मुंबईत 500 प्रकरणं आहेत.