मुंबई: गोवंडीतील शिवाजी नगर भागातून ANC ने जप्त केले 33 लाख किंमतीचे ड्रग्स पिल्स, दोघांना केली अटक
Govandi Drugs Pills Seized (Photo Credits: Twitter/ANI)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) समोर आले. त्यानंतर देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यात ड्रग्ज संबंधा छापे घालण्यात आले. अनेक ठिकाणी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ड्रग्ज विरोधी पथकाने ड्रग्जसारख्या अमली पदार्थांविरोधी धडक मोहिम सुरु केली असून यात आतापर्यंत अनेकांना अटक झाली आहे. त्यात आता मुंबईच्या गोवंडी भागातील शिवाजी नगर परिसरात 33 लाख किंमतीचे ड्रग्ज पिल्स (Durgs Pills) पोलिसांनी जप्त केले आहे. अँटी नारकोटिक सेल च्या पथकाने ही कारवाई केली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

घाटकोपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोवंडीच्या शिवाजीनगर भागात ANC ने केलेल्या छापेमारीत 66,000 ड्रग्ज पिल्स जप्त करण्यात आल्या आहेत. ज्याची किंमत जवळपास 33 लाख रुपये इतकी आहे. याबाबत चौकशी सुरु असून पोलिस अधिक तपास करत आहेत. अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. हेदेखील वाचा- Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी 58 कोटी रुपयांचे Mephedrone जप्त, महाराष्ट्रातील ATS कडून 13 जणांना अटक

मागील महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी 5 जणांना अटक करुन त्यांच्याकडून 20 किलोचा ड्रग्जसाठा (Drugs) जप्त केला. याची किंमत सुमारे 20 कोटी इतकी आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये मेफेड्रॉन (Mephedrone) आणि म्याव म्याव (Meow Meow) ड्रग्जचा समावेश आहे.