प्रजाकसत्ताक दिनानिमित्त मुंबईत पुन्हा एकदा नव्याने मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) अश्वदल कार्यरत होणार आहे. याचे अनावरण 26 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे या अश्वदलासोबत त्यांच्या गणवेशाची विशेष चर्चा सुरु आहे. घोडेस्वार पोलिसांचा गणवेश प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी तयार केला आहे. या गणवेशाचे आणि अश्वदलाचे कौतुक करण्यासाठी म्हणून Amul कंपनीने आपल्या खास शैलीत त्यांना मानवंदना दिली आहे. हा अश्वदलाला आणि प्रजाकसत्ताक दिनाला उद्देशून हा लोगो तयार करण्यात आला आहे.
हा फोटो त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला असून 'Police Ke Liye Horsela' असे कॅप्शन दिले आहे.
पाहा ट्विट:
#Amul Topical: Mumbai’s mounted unit to be officially unveiled at Republic Day parade! pic.twitter.com/iAMPqM9a0O
— Amul.coop (@Amul_Coop) January 20, 2020
इतकच नव्हे तर आपल्या उत्पादनांच्या प्रमोशनसाठी त्यांनी या फोटोखाली 'Gallop it down' असेही लिहिले आहे.
अमूल ही भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी दुग्ध उत्पादक आणि उत्पादन पुरविणारी कंपनी आहे. Amul नेहमी आपल्या आकर्षक जाहिरातींमुळेही तितकीच प्रसिद्ध आहे. तसेच सद्य परिस्थितीवर अवलंबून फोटो बनविण्यातही अव्वल आहे. त्यामुळे प्रजाकसत्ताक दिनी मुंबईत होणा-या अश्वदलाचे विशेष कौतुक करण्यासाठी त्यांनी ही सुंदर जाहिरात बनविली आहे.
मुंबई पोलीस दलामध्ये आता अश्व दलाचाही समावेश करण्यात येणार आहे. येत्या 26 जानेवारी 2020 पासून मुंबई पोलीस दलात अश्वदल सहभागी होत आहेत. पोलीस घोड्यावर स्वार असल्यामुळे त्यांना उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि समुद्र किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी अश्वदल उपयुक्त ठरणार आहे.