महाराष्ट्र

Aaditya Thackeray यांना CM पदासाठी तयार करुन देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते, उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मग मी दिल्लीच्या राजकारणात जातो, असा शब्द स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला होता.

Woman Molesting Shopping Centre Washroom: खरेदी केंद्राच्या शौचालयात महिलेचा विनयंभंग, हत्येचा प्रयत्न; मुंबई पोलिसांकडून सुरक्षा रक्षकास अटक

अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रमाशंकर गौतम उर्फ संदीप पांडे नावाच्या 21 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या शौचालयात महिलेचा विनयभंग (Man Molesting Woman) आणि तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Navi Mumbai: पाम बीच रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू; पक्षीप्रेमींकडून चिंता व्यक्त (Watch Video)

टीम लेटेस्टली

22 वर्षीय सिनेमॅटोग्राफर आणि पक्षी प्रेमी हमराज खुराना याने सर्वात प्रथम फ्लेमिंगोला रस्त्यावर पाहिले. खुराना यांनी सांगितलं की, आम्ही एनआरआय सिग्नलवर पाम बीचच्या सर्व्हिस रोडवर एक पक्षी लोळताना आणि उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रयत्नांनंतरही पक्षी खाली कोसळला आणि मरण पावला.

Gold Seized at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर 5.71 कोटी रुपयांचे 9.4 किलोपेक्षा जास्त सोने जप्त; 8 जणांना अटक

टीम लेटेस्टली

सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 5.71 कोटी रुपयांचे 9.482 किलोग्राम सोने जप्त केले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. सोमवार ते गुरुवार दरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आठ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement

Buldhana Police: शस्त्रांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Pooja Chavan

बुलढाणा आणि मध्यप्रदेशातील राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी ४ पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

Mumbai Water Cut: मुंबईत या भागात या दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Amol More

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पी दक्षिण विभागातील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील जलवाहिनी बदलण्यात येणार आहे.

Sharad Pawar jibe Amit Shah: शरद पवार यांच्या गुगलीने अमित शाह बोल्ड; सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवला

अण्णासाहेब चवरे

1967 पासून मी राजकारणात आहे. त्यामुळे त्यापैकी नेमक्या कोणत्या 10 वर्षांचा तुम्हाला हिशोब हवा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या प्रचाराचा नारळ वाढवताना ते बोलत होते.

Fire Breakout Phoenix Mall Pune: पुणे यथील विमान नगर परिसरात फिनिक्स मॉलला आग, परिसरात धुराचे लोट (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुणे यथील विमान नगर परिसरात असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये मोठी आग भडकली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. आग मोठ्या प्रमाणवर असलल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागली असताना काही कर्मचारी मॉलमध्येच अडकल्याचे समजते.

Advertisement

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांची माघार, महायुतीसमोर पेच; नाशिकच्या जागेवरुन संभ्रम कायम

अण्णासाहेब चवरे

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन सत्ताधारी पक्षांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर आपण नाशिक मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेत आहोत, असे छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याउलट विरोधी पक्षांत असलेल्या महाविकासआघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला आणि ते कामलाही लागले, असेह ते म्हणाले.

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, आडोशी बोगद्याजवळ वाहन कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

टीम लेटेस्टली

रात्री उशिरा झालेल्या या अपघातामुळे सकाळच्या वेळेतही वर्दळीच्या महामार्गावर अनेक तास वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणारे वाहनधारक पहाटेच्या सुमारास लांबच लांब ट्रॅफिक लेनमध्ये अडकले होते.

Mumbai Local Power Block: मुंबई मध्ये 19-21 एप्रिल दरम्यान मध्य रेल्वे कडून पॉवर ब्लॉक; हार्बर आणि मेन लाईन वर होणार 'हे' बदल

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वे वर रात्री 12.14 ची सीएसएमटी ते कसारा ही शेवटची लोकल असणार आहे. कर्जत, ठाणे ट्रेन रद्द करण्यात आली आहे. यामुळे कर्जत, खोपोली मध्ये जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Sangli and Madha Lok Sabha constituencies: शरद पवार यांचा डाव, माढ्याचा तिढा सुटला, सांगलीतही मनोमिलन; महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या या प्रयत्नांना ठाकरे आणि पवार हे तोडीस तोड खेळी करत आहेत.

Advertisement

Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात कमी उंचीची महिला Jyoti Amge ने बजावला नागपूर मध्ये मतदानाचा अधिकार!

Dipali Nevarekar

Jyoti Amge च्या उंचीची नोंद गिनीज बुक ऑफ इंडियात आहे.

Maharashtra Weather Forecast: वातावरणाचे खेंदाट! अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उन्हाचा तडाका; माहाराष्ट्रातील हवामान अंदाज, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

राज्यात उन्हाळा जोर धरतो आहे. वाढत्या तापमानासोबत उन्हाचा तडाखा आणखीच वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain in Maharashtra) कोसळतो आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणाचा हा नेमका कोणता प्रकार आहे हे समजणे कठीण झाले आहे. एका बाजूला अवकाळी, कडाक्याचे उन आणि दमट वातावरण यांमुळे वातावरणाचे खेंदाट झाल्याचे पाहयला मिळत आहे.

Lok Sabha Election 2024: चांगल्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकणार याची 101% खात्री - नितीन गडकरी यांनी मतदानापूर्वी व्यक्त केला विश्वास

टीम लेटेस्टली

आज लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये मतदानाचं कर्तव्य प्रत्येकाने बजावलं पाहिजे असे म्हणत मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे यासाठी आवाहन केले आहे.

Lok Sabha Elections 2024: शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे गट) प्रचारासाठी राज्य परिवहन बसचा वापर; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते Atul Londhe यांनी दाखल केली तक्रार

टीम लेटेस्टली

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांना पत्र लिहून सत्ताधारी महायुती आघाडीने आपले प्रचार साहित्य प्रदर्शित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसचा बेकायदेशीर वापर केल्याकडे लक्ष वेधले आहे.

Advertisement

Lok Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर

Amol More

शिर्डी मतदार संघातून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर साताऱ्यातून सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Lok Sabha Elections 2024: ‘राज ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार असल्याच्या' चर्चांना राज ठाकरे यांनी लावला पूर्णविराम; पहा खुलासा!

टीम लेटेस्टली

अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात हा संकेत असतो. असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून भरला डमी अर्ज

टीम लेटेस्टली

बारामती मध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना निवडणूकीच्या रिंगणात रंगणार आहे.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement