Lok Sabha Elections 2024: शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे गट) प्रचारासाठी राज्य परिवहन बसचा वापर; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते Atul Londhe यांनी दाखल केली तक्रार
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांना पत्र लिहून सत्ताधारी महायुती आघाडीने आपले प्रचार साहित्य प्रदर्शित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसचा बेकायदेशीर वापर केल्याकडे लक्ष वेधले आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी सुमारे हजारभर महाराष्ट्र राज्य परिवहन बसेसचा वापर करून, आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसने गुरुवारी सत्ताधारी महायुती सरकारमधील मित्रपक्ष शिवसेनेविरोधात (एकनाथ शिंदे) तक्रार दाखल केली. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांना पत्र लिहून सत्ताधारी महायुती आघाडीने आपले प्रचार साहित्य प्रदर्शित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसचा बेकायदेशीर वापर केल्याकडे लक्ष वेधले आहे.
लोंढे यांच्या पत्रात म्हटले आहे की, ‘बसेसवरील बॅनर्सवर शिवसेनेच्या धनुष्यबाणांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो आहे. तसेच त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेही फोटो आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणूक प्रचारासाठी सरकार आणि सार्वजनिक मालमत्तांचा वापर करता येणार नाही, अशी बंदी असतानाही शिवसेनेच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी अधिकाऱ्यांनी एक हजारहून अधिक बसेसचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या उल्लंघनांवर तातडीने कारवाई करून शिवसेनेच्या सर्व लोकसभा उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: केरळात सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवरून राहुल गांधीचे केंद्र सरकारवर टीकास्त्र)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)