महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी

टीम लेटेस्टली

तीव्र पावसामुळे कोकण आणि घाट क्षेत्रांमध्ये अनेक धोके निर्माण झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घाट क्षेत्रांमध्ये वाहनचालकांना कमी दृश्यमानता आणि भूस्खलनाच्या जोखमीबाबत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Pune: पालखी भाविकांना लक्ष्य करणाऱ्या चोरांच्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश; लाखो रुपयांचे दागिने आणि मोबाईल जप्त

Prashant Joshi

पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही टोळ्या पालखी मार्गावर भाविकांना लक्ष्य करत आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि 6 ने संयुक्त कारवाई करत या टोळीला पकडले.

पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनाचे विकले गेले बोगस पास; 6 जण चौकशीसाठी ताब्यात

Dipali Nevarekar

यंदा आषाढी वारीला मुख्यमंत्री वगळता अन्य कोणाचीही गाडी मंदिर प्रवेशद्वाराच्या परिसरापर्यंत जाणार नाही तसेच व्हिआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.

Pune Metro Phase-2: पुणेकरांना दिलासा! मेट्रो फेज-2 चा मार्ग मोकळा, वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली विस्ताराला मंजुरी

Prashant Joshi

या मार्गांमुळे चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोलीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना जोडले जाईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

Advertisement

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: आता अवघ्या 8 तासांत नागपूर-गोवा प्रवास; शक्तीपीठ एक्सप्रेसवेसाठी राज्याकडून 20,787 कोटींची मंजुरी, धार्मिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Prashant Joshi

या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे. यामुळे खनिज आणि औद्योगिक उत्पादनांचा व्यापार वाढेल, विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून. विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागास भागात औद्योगिक आणि कृषी उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे हजारो रोजगार संधी निर्माण होतील.

आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर LTT–Solapur आणि Solapur–Daund मार्गावर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या वाढवल्या; पहा वेळा, तिकीट बुकिंग अपडेट्स

Dipali Nevarekar

लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर दरम्यान च्या ट्रेनची बुकींग 26 जून पासून विशेष दरात सुरू होणार आहे. प्रवासी ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून ती बुकिंग करू शकणार आहे.

Sion, Bellasis Flyover Deadlines: सायनचा पूल मे 2026 तर बेलारिस पूल डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण होणार; बीएमसी ने जाहीर केल्या नव्या डेडलाईन्स

Dipali Nevarekar

मुंबई सेंट्रल स्टेशन बाहेरील Bellasis Flyover हा 15 डिसेंबर 2025 तर सायनचा पूल 31 मे 2026 पर्यंत खुला होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Forecast: कोकण सह सर्व घाट परिसरात 25 जूनसाठी ऑरेंज अलर्ट

Dipali Nevarekar

येत्या 24 तासात,कोकण व घाटांत मुसळधार-अतिमुसळधार होण्याचा अंदाज आहे तर नाशिक,पुणे घाट परिसरात रेड अलर्ट आहे.

Advertisement

Stray Cow Attack In Nashik: धक्कादायक! नाशिकमध्ये भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी (Watch Video)

Bhakti Aghav

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेने शहरात पुन्हा एकदा भटक्या गुरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओमध्ये गाय एका वृद्धावर वारंवार हल्ला करताना दिसत आहे.

Nashik Rains: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, गोदावरी नदीला यंदा पावसाळ्यात दुसऱ्यांदा पूर

Dipali Nevarekar

शुक्रवार (20 जून) पासून गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाऊस कमी झाला असला तरी, वरच्या प्रवाहातून वाढत्या आवकमुळे पाणी सोडणे सुरूच आहे.

Boat Capsizes In Savitri River: पोलादपूरजवळील सावित्री नदीत बचाव पथकाची बोट उलटली; थोडक्यात वाचले बचावकर्ते (Watch Video)

Bhakti Aghav

बचाव पथक नदीत बुडालेल्या एका तरुणाचा शोध घेत होते. नदीच्या तीव्र प्रवाहात बोटीचा तोल गेला आणि ती उलटली, ज्यामुळे सर्व कर्मचारी पाण्यात पडले.

HSRP Deadline Extension: महाराष्ट्रातील वाहनांवर एचएसआरपी बसवण्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवली; कमी प्रतिसादामुळे तिसऱ्यांदा मुदतवाढ

टीम लेटेस्टली

एचएसआरपी ही वाहन चोरी रोखण्यासाठी आणि वाहन ओळखीचे एकसमानीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेली एक अनिवार्य योजना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणे बंधनकारक आहे.

Advertisement

Junnar Shocker: जुन्नरमधील 1200 फूट दरीच्या पायथ्याशी आढळला 40 वर्षीय पुरूष आणि महाविद्यालयीन मुलीचा मृतदेह, पोलिसांकडून शोध सुरू

Bhakti Aghav

यात श्रीगोंदा तालुक्यातील 40 वर्षीय सरकारी अधिकारी रामचंद्र साहेबराव पारधी आणि आंबोली गावातील 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूपाली संतोष खुटान यांचा समावेश आहे. पोलिसांना ही दुहेरी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Shaniwar Wada-Swargate Tunnel Road: पुणेकरांना दिलासा! शनिवारवाडा ते स्वारगेट या प्रस्तावित चारपदरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला गती; केंद्र सरकारकडून सहकार्याचे आश्वासन

Prashant Joshi

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात, विशेषतः शनिवार पेठ, कसबा पेठ, आणि स्वारगेट परिसरात, दररोज लाखो वाहनांमुळे शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आणि पर्यावरणावर परिणाम होतो.

Prada च्या रॅम्प वर 'कोल्हापुरी चपला' पुन्हा भारताचा उल्लेख टाळल्याने भडकले नेटकरी

Dipali Nevarekar

फॅशन एक्सपर्ट्स आणि सोशल मीडीयावरील अनेक युजर्सनी पुन्हा एकदा प्राडा करून भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांपासून प्रेरणा घेऊनही त्याचं मूळ कुठलं आहे? हे सांगणं टाळल्याने राग व्यक्त केला जात आहे.

Mumbai Shocker: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीचा हत्या; आरोपीला अटक

Bhakti Aghav

आरोपी वसीम त्याची पत्नी गौशिया आणि दोन मुलांसह गोरेगाव पश्चिम येथे राहतो. वसीमला दारूचे व्यसन आहे. सोमवारी सकाळी वसीमने गौशियाकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, गौशियाने त्याला पैसे देण्यास नकार दिला.

Advertisement

'Hindi Not Compulsory': महाराष्ट्रात फक्त मराठीच बंधनकारक, हिंदी नाही; भाजप मंत्री Ashish Shelar यांचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

शेलार यांनी 23 जून रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, हिंदीला बंधनकारक करण्याचा कोणताही हेतू नाही. ‘महाराष्ट्रात फक्त मराठीच बंधनकारक आहे’. आम्ही हिंदीची सक्ती काढून टाकली आहे.

Bhandup House Wall Collapsed: भांडूप मध्ये घराची भिंत कोसळली; 2 चिमुरड्यांसह 3 जण जखमी

Dipali Nevarekar

एम टी अग्रवाल हॉस्पिटल मध्ये जखमींना दाखल केले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवा यांचे नाव देण्याची खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

Dipali Nevarekar

राजधानी एक्सप्रेस पुण्यातूनही जोडली पाहिजे, दिल्ली ते हैदराबाद एक्सप्रेस असो किंवा बेंगळुरू ते दिल्ली एक्सप्रेस असो, ती पुण्यातूनच गेली पाहिजे. अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai High Tide Warning: मुंबईकरांनो सावधान! BMC ने दिला 24 ते 28 जून दरम्यान सलग पाच दिवस मोठ्या भरतीचा इशारा; लाटांची उंची 4.75 मीटरपेक्षा जास्त

Prashant Joshi

साधारण 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धोकादायक मानल्या जातात, कारण त्यामुळे गंभीर पूर येऊ शकतो, विशेषतः जेव्हा सखल भागात मुसळधार पाऊस पडतो. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मते, या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान 19 जात उंचीच्या लाटांचे दिवस येण्याचा अंदाज आहे.

Advertisement
Advertisement