महाराष्ट्रात शालेय शिक्षणात तिसरी भाषा हिंदी अनिवार्य करण्यावरून मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांचा दुकानदारांना पाठ्यपुस्तकं न विकण्याचा इशारा
सरकार कडून तिसर्या भाषेच्या अंमलबजावणी बाबत भूमिका स्पष्ट करताना मुलांना हिंदी नको असल्यास अन्य कोणतीही भारतीय भाषा शिकण्यास विद्यार्थ्यांना मुभा असेल पण त्यासाठी किमान 20 विद्यार्थी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि सोबतच पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा नवा नियम लागू केल्यानंतर आता राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात हिंदी लादण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगत राज ठाकरेंनी शाळांच्या मुख्यध्यापकांना पत्र पाठवत हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयाचा विरोध करण्याचे आवाहन केले आहे. सध्या अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते शाळांना भेटी देत आहेत. काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते हिंदीची नवी पुस्तकं जाळत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिली ते चौथीची हिंदीची पुस्तकं न विकण्याचा मनसे कार्यकर्ते विक्रोळी मध्ये इशारा देत असल्याचं समोर आलं आहे.
विक्रोळी मधील मनसे कार्यकर्त्यांचा व्हिडिओ
यशवंत किल्लेदार दादरच्या साने गुरूजी शाळेत
राज ठाकरे यांचे आवाहन काय?
राज ठाकरे यांनी पहिली पासून तीन भाषा शिकण्याच्या सरकारच्या नव्या नियमाचा आणि त्यामध्येही हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य करत शिकवण्याच्या जीआर चा विरोध केला आहे. ज्यांना हिंदी शिकायची असेल ते ती पाचवी, सहावी नंतर शिकू शकतील. मात्र पहिलीपासून त्यांच्यावर हे ओझं नको. या बाबत राज ठाकरेंनी दोन पत्रं सरकारला यापूर्वी दिली होती आता तिसरं पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना देत सरकारच्या या हिंदी लादण्याच्या निर्णयाचा विरोध करण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान राज ठाकरेंनी सरकारला जर हे आव्हान वाटत असेल तर त्यांनी ते तसं समजून घ्यावं असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Hindi Language Row in Maharashtra: महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही; राज ठाकरे यांचे थेट शाळांना अल्टिमेटम; साहित्यिक, कलाकारांना ' मराठी' साठी एकत्र येण्याचं आवाहन .
दरम्यान सरकार कडून तिसर्या भाषेच्या अंमलबजावणी बाबत भूमिका स्पष्ट करताना मुलांना हिंदी नको असल्यास अन्य कोणतीही भारतीय भाषा शिकण्यास विद्यार्थ्यांना मुभा असेल पण त्यासाठी किमान 20 विद्यार्थी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.