Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan 2025: आज रात्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान; पहा मुक्कामाच्या ठिकाणांसह वेळापत्रक
आषाढी एकादशी साठी पंढरपूरात दाखल झालेली ज्ञानोबांची पालखी 5 ते 9 जुलै मुक्काम करणार आहे. त्यानंतर 10 जुलैला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
आषाढी वारी 2025 (Ashadhi Wari) साठी काल तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानानंतर आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan) ठेवणार आहे. यंदा ज्ञानोबांची पालखी थोडी उशिराने म्हणजे दुपारच्या ऐवजी रात्री 8 वाजता प्रस्थान ठेवणार आहे. 'रामकृष्ण हरी'चा जप करत आता वारकरी मंडळी ज्ञानोबाच्या पालखीसोबत पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. माऊलींचे भक्त हैबतबाबा आरफळकर यांनी ज्ञानोबांची स्वतंत्र पालखी आळंदीहून नेण्यास सुरूवात केली. 5 जुलैला अन्य संतांच्या पालख्यांसोबत संत ज्ञानेश्वर महराजांची पालखी देखील पंढरपूरामध्ये दाखल होणार आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या गोल, उभे रिंगण तारखा
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी मधून पुणे मार्गे सासवड, जेजुरी, वेल्हे, तरडगाव, फलटण, माळशिरज, वाखरी करत पंढरपूर मध्ये दाखल होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मध्ये 25 तारखेला वाल्हे येथे माऊलींच्या पादुकांना निरास्नान होईल. माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण 27 तारखेला लोणंद येथे होईल. 4 जुलैला दुसरे उभे रिंगण होईल. तर 1 जुलैला नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडेल. 2 जुलैला खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल, 3 जुलैला वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण होईल. चौथे गोल रिंगण 4 जुलैला बाजीरावाची विहीर याठिकाणी होईल. नक्की वाचा: Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे वेळापत्रक
आषाढी एकादशी साठी पंढरपूरात दाखल झालेली ज्ञानोबांची पालखी 5 ते 9 जुलै मुक्काम करणार आहे. त्यानंतर 10 जुलैला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.