Live Palkhi Tracking: 20 जूनला पुण्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; diversion.punepolice.gov.in वर पालखींचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्याची सोय

पुण्यातील वारीचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहता येणार आहे. diversion.punepolice.gov.in वर उद्या पुण्यात पालख्या आल्यानंतर अपडेट्स पाहता येणार आहेत.

Mauli Palkhi | X@MarathiBrain

आषाढी वारी 2025 ला सुरूवात झाली आहे. आज ज्ञानोबांची पालखी आळंदी मधून प्रस्थान करणार आहे. उद्या 20 जून दिवशी पुण्यात संत तुकाराम आणि ज्ञानोबांची पालखी एकत्र येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पुण्यात भाविकांची तोबा गर्दी असते. सुमारे 3-4 लाख भाविक या निमित्ताने पुण्यात असल्याने वाहतूकीमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. दरम्यान यंदा वारीतील गर्दीच्या नियंत्रणासाठी एआय चा वापर केला जात आहे, अशात भाविकांना पुण्यातील वारीचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहता येणार आहे. diversion.punepolice.gov.in वर उद्या पुण्यात पालख्या आल्यानंतर अपडेट्स पाहता येणार आहेत.  त्यानुसार नागरिकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात पालख्यांंचे लाईव्ह ट्रॅकिंग कुठे पहाल?

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement