Ashadhi Wari 2025: आषाढी वारीत दगडूशेठ मंदिरात पालख्यांचा स्वागत सोहळा ते वाखरीत चिखल खेळणं वारकर्‍यांच्या या 6 परंपरा देतील डोळ्यांचं पारण फेडणारे अनुभव

वारीमध्ये पालख्यांचे गोल रिंगण, उभे रिंगण पाहण्यासाठी अनेक वारकरी, भाविक जमा होतात पण त्यासोबतच अनेक रूढी परंपरा वर्षानुवर्ष वारकरी मंडळी जपत आहेत.

Warkari | Facebook/Warkari_pandharicha

आषाढी एकादशी साठी संतांच्या पालख्यांचे पंढरपूर कडे प्रस्थान सुरू झाले आहे. हरी नामाचा जयघोष करत वारकरी पायी पंढरपूर कडे निघतात. महाराष्ट्रात वारकरी संप्रादयाची ही वारीची जुनी परंपरा आहे. लाखो वारकरी आह 21 व्या शतकामध्येही शिस्तबद्ध पद्धतीने पायी वारी चालतात. वारकर्‍यांसोबतच या पालख्या ज्या भागातून मार्गक्रमण करतात तेथील भाविकांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतात. मग या आषाढी वारी मध्ये टप्प्या टप्य्याने येणार्‍या काही परंपरांना अनुभवणं हे सामान्य भाविकांसाठी अदभूत गोष्ट ठरू शकते. मग पहा यंदा आषाढी वारी मध्ये कोणत्या टप्प्यावर कधी, कुठे तुम्ही हे नजारे अनुभवू शकता. नक्की वाचा: Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan 2025: आज रात्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान; पहा मुक्कामाच्या ठिकाणांसह वेळापत्रक. 

पुण्यामध्ये संत तुकराम, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी स्वागत

आषाढीची वारी देहू आणि आळंदी मधून निघाली की यंदा 20 जूनला पुण्यात पोहचणार आहे. पुण्यात दोन्ही पालख्यांचे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराकडून स्वागत केले जाते. या सोहळ्याला सुमारे 3-4 लाख वारकर्‍यांची उपस्थिती असते. यासाठी मंदिरालाही आकर्षक सजावट केली जाते. वारकरी मंदिर परिसरात जल्लोष करतात. Live Palkhi Tracking: 20 जूनला पुण्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; diversion.punepolice.gov.in वर पालखींचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्याची सोय.  

दिवेघाटात वारकरी

दिवेघाटाची अवघड चढण माऊलींच्या पालखीसोबत लाखो वारकरी पार करतात. हा नजारा पाहण्यासारखा असतो. हा वारीतील सुंदर टप्पा असतो. यंदा वारी 22 जूनला दिवेघाटात असणार आहे. दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात येणारी वारी पाहण्यासाठी अनेक भाविक तासोन तास डोंगरावर ठाण मांडून बसतात.

मल्हारीच्या दारी वारी

आषाढी वारीत वारकरी पंढरपूरला जाताना वाटेत जेजुरी गडावर थांबून खंडोबाचे दर्शन घेतात.

खंडोबा देवस्थानकडून आणि जेजुरी नगरपालिकेच्या वतीने वारकर्‍यांचे स्वागत केले जाते. जेजुरीमध्ये, वारकरी आणि भाविक, भंडारा उधळून आणि 'येळकोट येळकोट जय मल्हार' चा जयघोष करत उत्साहात सहभागी होतात. हा सोहळा 24 जूनला अनुभवता येईल.

नीरा स्नान

पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदी वर माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान केले जाते. नीरा ही एक पवित्र आहे. वारकरी या नदी स्नान करून कळत नकळत घडलेल्या पापामधून मुक्तीची याचना करातात. या नीरा स्नानानंतर माऊलींची पालखी साता-याकडे निघते. यंदा हे नीरा स्नान 26 जुलै दिवशी आहे.

सोपानकाका- माऊलींची भेट

पंढरपूरच्या वारीमध्ये, संत ज्ञानेश्वर (माऊली) आणि संत सोपानकाका यांच्या पालख्यांची भेट हा एक महत्वाचा क्षण असतो. दोन्ही पालख्यांमधील वारकरी एकमेकांना नारळ प्रसाद देतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. ही बंधुभेट बघण्यासारखी असते. 3 जुलैला ही भेट होईल.

वाखरी गोल रिंगणानंतर चिखलात खेळणं

वाखरी येथे गोल रिंगण झाल्यावर वारकरी चिखलात खेळण्याचा आनंद घेतात. पावसाळ्यामुळे चिखल झालेला असला तरी, त्यात खेळणे हा एक पारंपरिक आनंद मानला जातो. हा सोहळा 4 जुलैला आहे.

यंदा 6 जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. वारी ही प्रामुख्याने महाराष्ट्रातून निघत असली तरीही आजूबाजूच्या राज्यातून आणि अनेक परदेशी पाहुणे देखील वारीत चालताना, सहभागी होताना दिसतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement