Mumbai Rain Alert: मुंबईमध्ये संततधार पाऊस, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी; पुढचे 3 ते 4 तास अधिक महत्त्वाचे
आयएमडीने 19 जून रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रदेशात जोरदार पावसामुळे पवई तलाव ओसंडून वाहत आहे. संपूर्ण हवामान अंदाज आणि अपडेट्स तपासा.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी गुरुवारी (19 जून) यलो अलर्ट (Yellow Alert Mumbai) जारी केला आहे. आज दिवसभर जोरदार पावसाची (Mumbai Rain) शक्यता असून आकाशात ढगाळ वातावरण राहील. विशेषत: पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयएमडीने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार (IMD Weather Forecast), 19 जून रोजी मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज असून, 20 जूनला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 आणि 22 जून या दिवशी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. त्यानंतर 23 आणि 24 जून दरम्यानही पावसाचे प्रमाण कायम राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत तापमान 25°C ते 32°C दरम्यान राहणार आहे.
पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडला
दरम्यान, मुंबईतील पवई तलाव सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी 6 वाजता वाहू लागला. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तलावाचा पाणीसाठा 545 कोटी लिटर (5.45 बिलियन लिटर) असून, सध्या पाणीपातळी 195.10 फूट एवढी नोंदवण्यात आली आहे. (हेही वाचा, Raigad Schools and Colleges Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, रायगड जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी)
बीएमसीकडून व्हिडिओ जारी
BMC ने X (पूर्वीचे ट्विटर) वर पवई तलाव वाहताना दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, पवई तलाव हे कृत्रिम असून त्याचे पाणी पिण्यायोग्य नाही. हे पाणी मुख्यतः औद्योगिक आणि अरे दूध डेअरी परिसरातील उपयोगासाठी वापरले जाते. सतत पडलेल्या पावसामुळे तलाव भरून वाहू लागल्याचे सांगण्यात आले आहे.
आयएमडीकडून पहाटे पहाटे इशारा
महाराष्ट्रात मान्सून सक्रीय
नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, पाण्याने भरलेल्या रस्त्यांपासून दूर राहावे आणि पावसाळी हवामान लक्षात घेऊन बाहेर पडण्याचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.