Raigad Schools and Colleges Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, रायगड जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात मान्सून मजबूत होत असल्याने पुण्यातील घाट, रायगड, ठाणे आणि इतर कोकण प्रदेशांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Raigad Schools and Colleges Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, रायगड जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
Schools Holiday | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Monsoon Weather Update: रायगड जिल्ह्यातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा व महाविद्यालये आज बंद (Raigad School Holiday) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची व शिक्षकांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात मॉन्सून अधिक सक्रिय झाल्याने, पुणे (Pune) व कोकण (Konkan Rainfall) भागांमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता (IMD Rain Forecast) हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र (RMC), मुंबई यांनी पुण्याच्या घाट परिसर, तसेच रायगड (Raigad), ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.

समुद्रात कमी दाबाचा पट्टा

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर मध्यम स्वरूपात कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. हा इशारा अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर तयार झालेल्या स्पष्ट कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देण्यात आला आहे. या प्रणालीमुळे समुद्रातून आर्द्रतेने भरलेले वारे मोठ्या प्रमाणात येत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, घाट व किनारपट्टीच्या भागांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Mumbai Rain Alert: मुंबईमध्ये संततधार पाऊस, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी; पुढचे 3 ते 4 तास अधिक महत्त्वाचे)

खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी

पश्चिम महाराष्ट्र: उद्याचे हवामान

पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक असणार असून, काही ठिकाणी अल्प वेळात 70 मिमीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सखल भागांत पाणी साचणे, दृष्यमानता कमी होणे आणि रस्ते निसरडे होणे, अशी स्थिती निर्माण होऊ शकते, विशेषतः पहाटे आणि संध्याकाळी.

हवामान विभागाने नागरिकांना अधिकृत इशाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे, तसेच आवश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा विशेष फटका बसू शकणाऱ्या आणि डोंगराळ भागात जाणे टाळा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या भागात आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, यंदाच्या वर्षी काहीसा वेळेआधीच दाखल झालेला मान्सून दमदार कामगिरी करत होता. मात्र, पुढे मध्येच त्यात खंड पडला आणि त्याने विश्रांती घेतली की, काय अशी चर्चा सुरु झाली.  पण, दाखल झाल्यानंतर आठवडाभराची विश्रांती घेऊन मान्सून पुन्हा एकदा दमदारपणे परतला असून तो जोरदार बँटींग करतो आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा असा सर्व प्रदेशांमध्ये तो दमदारपणे बरसताना दिसतो आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2025 09:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).