Ajit Pawar Video: पुण्यात संचेती रुग्णालयाजवळील पुलाखाली सकाळी एक अपघात झाला. अपघातात एक जण जखमी झाला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौऱ्यावर असताना अपघातग्रस्ताची मदत केली. अपघातात जखमी असलेल्या तरुणाच्या मदतीसाठी त्यांनी धाव घेतला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे. (हेही वाचा- अमित शाह यांचा दौरा, अजित पवार यांची दांडी; विमानतळावर धावती भेट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस)
मिळालेल्या माहितीसाठी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी निवासस्थानाहून सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते. त्याचवेळी शहरातील संचेती रुग्णालयाच्या पुलाखाली एका दुचाकीचा अपघात झाला. भरधाव रिक्षेची दुचाकीला धडक लागली होती. या धडकेत एक जण जखमी झाले. जखमी व्यक्ती रस्त्यावर पडून होता. यावेळी अजित पवार यांनी तत्परता दाखवत ताफा थांबवला. सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांसह स्वत: अजित पवार कारमधून खाली उतरले आणि अपघातग्रस्त तरुणाची मदतीसाठ धाव घेतली. तरुणाची विचारपूस केली. ताफ्यातील उपस्थित डॉक्टरांना उपचार करण्यासाठी सांगितले.
अजित पवार धावले मदतीसाठी पाहा व्हिडिओ
पुण्यात संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तत्परता दाखवत ताफा थांबवून अपघातग्रस्तांची मदत केली. या मदतीसाठी अपघातग्रस्तांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.#AjitPawar #Accident #Pune pic.twitter.com/A8ZJpwZJv7
— Amol More (@moreamolc) September 10, 2024
अपघातग्रस्त तरुणाला किरकोळ जखम झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिली. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे कार्यतत्परता दिसून येते. अपघातग्रस्त तरुणाने अजित पवार यांचे आभार देखील मानले. त्यानंतर ते पुढील कामासाठी निघाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यांचे कौतुक केले.