अजित पवार यांना होमपीचवर धक्का? पिंपरी चिंचवड येथील कट्टर समर्थक शरद पवार पक्षात परतण्याची शक्यता
Ajit Pawar | (Photo credit: archived, edited, representative image)

पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad)  अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेनंतर आता अजित पवारांचे  कट्टर समर्थक नाना काटे (Nana Kate) हे  शरद पवार गटात जाणार असल्यच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे लोकसभा निकालानंतर  अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.  पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी चिंचवडची पोटनिवडणूक लढलेले अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे काहीही झालं तरी, मी चिन्हावरचं लढणार,  यावर ते ठाम आहेत.  (हेही वाचा - Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून)

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवारांनी सर्वांसाठी दारं खुली ठेवल्याचं जाहीर केलं. आता याच दारातून नाना काटे ही घरवापसी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांनी ऑफर दिल्यास, तुम्ही तुतारी चिन्हावर लढणार का? या प्रश्नावर मी चिन्हावरचं निवडणूक लढणार असं म्हणत त्यांनी संभ्रमावस्था वाढवली

शरद पवार गटात प्रवेश पवार करणार का? असे विचारले असता नाना काटे यांनी स्मितहास्य करत त्यावेळेस सांगू असे म्हणत संभ्रमावस्था वाढवली. शरद पवारांनी जर तिकिट दिले तर निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना नाना काटे म्हणाले, सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाईल याविषयी कोणतीही निश्चितता नाही. कारण भाजपमध्ये इच्छुक उमेदवार जास्त आहेत. जगताप यांच्याकडे देखील दोन उमेदवार आहेत.