Theft (Representative Image- File)

अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील श्रीगोंदे (Shrigonde) या छोट्या भागात मंगळवारी मध्यरात्री एक धक्कदायक घटना घडल्याचे समजत आहे. एका आदिवासी पाड्यातील महिलेला काही भुरट्या चोरांनी बलात्काराची (Rape Threat) भीती दाखवत तिच्या घरातच दरोडा घातल्याचे माहिती समोर येतेय. संबंधित महिलेच्या घरून 1 हजाराचा फोन आणि 3 हजाराचे दागिने लंपास करण्यात हे चोर यशस्वी ठरले आहेत. तूर्तास महिलेनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून पोलीस अधीक्षक स्वतः या घटनेत लक्ष घालून तपास करत आहेत. लॉक डाऊन काळात ऑनलाइन Food Order करणे पडले महागात; महिलेला 50 हजाराचा गंडा

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री या आदिवासी महिलेच्या घरात काही चोर शिरले त्यांनी आपल्यासोबत तलवार आणली होती. याच तलवारीची भीती दाखवून त्यांनी महिलेला घाबरवले, त्यांनंतर तिच्याशी शारीरिक गैरवर्तन करून बलात्काराची धमकी दिली. या अचानक घडलेल्या प्रसंगाने गांगरून गेलेल्या महिलेने आपल्याजवळ असणाऱ्या सर्व गोष्टी चोरांना देऊन टाकल्या. यावेळी तिने आरडाओरडा करू नये म्ह्णून चोरांनी तिच्यावर हल्ला सुद्धा केला ज्यात महिलेला जखमा झाल्या असून सध्या तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान या अज्ञात चोरांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक मागील काळात लॉक डाऊन मुळे राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही अद्याप काही ठिकाणहून असे छोट्यामोठ्या चोरीच्या तक्रारी समोर येत आहेत. अलीकडेच मुंबईतील वडाळा भागात सुद्धा एका बंद असणाऱ्या वाईन शॉप वर डल्ला ताकात चोरांनी 35 हजार रुपये तर 182 दारूच्या बाटल्या लंपास केल्या होत्या. तर मुंबईतीलच एका महिलेला ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या बहाण्याने 50 हजाराचा गंडा घालण्यात आला होता.