खासदार Navneet Rana यांचा 'तो' व्हिडिओ पाहिल्यानंतर Rupali Chakankar यांचा पंतप्रधान Narendra Modi यांना टोला
Navneet Kaur, Rupali Chakankar, Narendra Modi (Photo Credit: PTI/FB)

इंधनदरवाढी (Fuel Price) आणि घरगुती गॅसच्या किंमतीत (LPG Cylinder Price) सातत्याने होणारी वाढ पाहता सर्वसामन्य जनता बेजार झाली आहे. याचपार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा चुलीवर भाकरी थापतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. एकीकडे नवनीत राणा यांच्या या व्हिडिओला त्यांच्या समर्थकांनी मोठी पसंती दर्शवली आहे. तर, दुसरीकडे याच व्हिडीओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवनीत राणा चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. यामध्ये त्या चपात्या लाटून चुलीवरील भाजत आहेत. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आता या व्हिडिओवर रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. गॅस महाग झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅसऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!, अशा आशयाचे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केली आहे. हे देखील वाचा- Sharad Pawar meets Amit Shah: शरद पवार यांनी सांगितला अमित शाहा यांच्यासोबतच्या बैठकीचा तपशील

ट्वीट-

या व्हिडीओच्या माध्यमातून काही नेटकऱ्यांनी उज्ज्वला योजना अपयशी झाल्याचीही टीका केली आहे. महिलांच्या आरोग्याची निगा राखणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत देशभरात 6 कोटींहून अधिक मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. मात्र, या कुटुंबांना योजनेतील दुसरा सिलिंडर खरेदी करणे परवडत नसल्याने असंख्य कुटुंबांनी योजनेकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.