Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे विरोधात दलित, मराठा बांधव आक्रमक; ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

अभिनेत्री केतकी चितळे नुकताच एका कार्यक्रमात ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. यानंतर दलित आणि मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. केतकी चितळेवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.  केतकीने दलित समाजाबरोबरच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली जात आहे.   परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमात केतकी चितळेने ॲट्रॉसिटी कायद्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. (हेही वाचा - CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेटच बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले 'पार्श्वभूमी राजकीय नाही पण भाषा..')

केतकी चितळेने आपल्या भाषणात ॲट्रॉसिटी करणाऱ्यांचे रॅकेट सुरूअसल्याचं वक्तव्य केलं. परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेत तिने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या भाषणाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. परळी येथे ब्राह्मण समाजाची राज्यस्तरीय परिषद झाली. यावेळी केतकी चितळेने हजेरी लावली. या परिषदेमध्ये भाषण करत असताना केतकीने ॲट्रॉसिटी ॲक्टबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काही लोक ॲट्रॉसिटी ॲक्टचे रॅकेट चालवत असून याबाबत आरटीआय टाका आणि गेल्या 5 वर्षांची माहिती मिळवा, असे आवाहन तीने केले.

मुंबईत एक वकील आहे ज्यांनी गेल्या १५ ते २० वर्षांत ६५ ॲट्रॉसिटीच्या केसेस केल्या आहेत. अनेक प्रकरणात त्यांचा साक्षीदार एकच असतो. असे अनेक वकील आहेत. हे अख्ख रॅकेट असून त्यांचे जोरात काम सुरू आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा.', अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.