छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका शासकीय ग्रामीण रुग्णालयात (Government Hospital) कपडे काढून फिरणाऱ्या डॉक्टरावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात पैठण तालुक्यातील (Paithan Taluka) बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या संदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर त्यानंतर संबंधित डॉक्टरला शासकीय सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. (हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये मद्यधुंद डॉक्टर रुग्णालयातच झाला निर्वस्त्र, व्हिडिओ व्हायरल)
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टरने निर्वस्त्र होऊन नग्न अवस्थेत रुग्णालयात फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे अंगावर एकही कपडा नसलेला हा डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. हा सर्व प्रकार तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा डॉक्टर औषधांचा नशा करतो आणि नशेत असतांना त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. डॉ. केयुर चाकूरकर हा नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. मात्र, त्याला नशेची सवय असल्याने तो अनेकदा रुग्णालयात नशा करून येत होता.
बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या आयसीयूमध्ये एक डॉक्टर नग्न अवस्थेत फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यावर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याची गंभीर दखल घेत संबंधित डॉक्टरला तात्काळ कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी यांनी दिली आहे. मागील काही वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नशेचे प्रमाण वाढले आहेत. खास करून अनेक तरुण या नशेच्या आहारी जातांना पाहायला मिळत आहे.