Mumbai: मुंबईतील कांजूरमार्ग येथे एका उत्तर प्रदेशातील तरुणाने ये - जा करणाऱ्या तरुणींचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. तरुणींनी त्याला व्हिडिओ काढण्यास नकार दिल्यानंतरही त्याने रेकॉर्डीं सुरु ठेवले होते. तरुणींनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी तरुणाला मनसेकडून चोप मिळाला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- शिक्षिकेची तीन विद्यार्थ्याला काठीने बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी संतापले)
मिळालेल्या माहितीनुसार, कांजूर येथील अशोक नगर परिसरातील दातार कॉलनी येथे एका दुकानात काम करणारा मुस्लिम तरुण परिसरातील मुलींचे रेकॉर्डींग करत होता. काही मुलींनी यावर आक्षेप घेतल्यानंतरही त्याने रेकॉर्डींग सुरु ठेवले. रेकॉर्डिंग केल्यानंतर त्यांने मुलींचा पाठलाग देखील केला. तरुणींनी आरडाओरड करत स्थानिकांनी घटनेची माहिती दिली.
मनोज चव्हाण यांनी तरुणीला दिला चोप (पाहा व्हिडिओ)
True Masterstroke
As soon as the locals came to know that a Bangladeshi was shooting videos of girls in Datar Colony of Bhandup Kanjoor area of Mumbai... they called Mr. Manoj Chavan, General Secretary of the MNS party.
After that, the Bangladeshi was handed over to the police… pic.twitter.com/zwV8GAksbG
— Kedar (@shintre_kedar) August 22, 2024
त्यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून मुलींचा समावेश असलेला खोडसाळ व्हिडिओ चित्रित केल्यामुळे उत्तर प्रदेशातील 23 वर्षीय रहिवाशाविरुद्ध मुंबई पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. इरफान अहमद माजिद अहमद असं आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी मनसे नेते मनोज चव्हाण यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चव्हाण आणि इतर मनसे कार्यकर्त्यांनी इरफानला चोप दिला.
आरोपीला मनोज चव्हाण या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी इरफान अहमद माजिद याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींने पोलिसांसमोर सांगितले की, मी फ्रॉन्क करत होता. सोशल मीडियावर फ्रॅन्क व्हिडिओ बनवून अपलोड करण्यासाठी तो व्हिडिओ रेकॉर्ड करत होता.