Nashik Lightning Strikes: नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे वणी परिसरात वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून वीज कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहेत. याचपार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शिरवाडे वणी (Shirwade Wani) परिसरात अशीच एक दुर्घटना घडली आहे. शेतात काम करत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टीव्ही9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार, विभा गुरव असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. विभा या शनिवारी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, दुपारनंतर शेरवाडी परिसरात वादळी पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी विभा यांच्या अंगावर वीज कोसळली. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Ganag Rape: लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये महिलेवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींना अटक तर अन्य जणांचा शोध सुरु

नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबक तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वीज कोसळल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला होता. रामू रामचंद्र चंद्र असे त्या तरूणाचे नाव होते. गुरांना रानात चरायला घेऊन गेले असताना रामू यांच्या अंगावर वीज कोसळली. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शाहीन वादळाचा शनिवारी (9 ऑक्टोबर) आणि रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे.