Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजी नगर येथील धक्कादायक प्रकार, कॉफी कॅफेमध्येच मित्राकडून अल्पवयीन मैत्रीणीवर अत्याचार; नग्न फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी
Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Rape Case: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉफी कॅफेमध्ये नेऊन मित्राने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सातारा पोलिस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन वाघ असं आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी वय वर्ष (17) आणि आरोपी मुलगा नितीन यांची ओळख एका अभ्यासिकेत झाली होती. तेव्हा पासून ते एकमेकांचे मित्र झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एका पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. एके दिवशी नितीनने पीडित मुलीचा नंबर घेतला होता. काही दिवसानंतर नितीनने तीला फोन करण्यास सुरुवात केली. तीने अनेकदा फोन न करण्यास विनंती केली परंतु त्याने एक ऐकले नाही. त्यानंतर नितीनने पीडित मुलीला अभ्यासासाठी घरी बोलावले होते. नितीनचा एक मित्र आणि पीडित मुलीची एक मैत्रीण पीडितेसह नितीनच्या घरी गेले. त्यावेळी तीला काही कारणानिमित्त बेडरूममध्ये बोलावून घेतले होते. दरम्यान नितीनने तिच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न केला. तीच्यावर जबरस्ती करू लागला. पीडितेने कसातरी जीव वाचवला आणि घरा बाहेर पळून गेली. बदनामी होईल या करीता तीन या घटनेची माहिती कोणालाच दिली नाही. या घटनेनंतर नितीनने तिची माफी मागितली होती.

काही दिवसांनतर पुन्हा पीडितेला नितीनचा फोन आला आणि फिरायाल जावू असं सांगत बीड बायपासला बोलावून घेतले. नंतर तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथं तिच्यासोबत सेल्फी काढले. त्यानंतर तिला जबरदस्तीने कपडे काढून तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. तिला मारहाण करून तीचे अश्लिल आणि नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर धमकी देत नितीनने पुन्हा कॉफी कॅफेमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तिला तेथे सुध्दा धमकी दिली. पीडितेने फोटो डिलिट करण्यासाठी अनेकदा विनंती केली. नितिनच्या त्रासाला कंटाळून ती तणावात गेली.

तणावामुळे तिच्या वर्तणुकीत बदल होताना पाहिल्यावर घरच्यांनी विचारणा केली. काही दिवसांनतर आई आणि भावाला या प्रकरणी माहिती दिली. दोघांनी नितीन विरोधात सातारा पोलिस ठाण्यात तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.