अमरावतीमध्ये (Amravati) 2 एप्रिल रोजी एका 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवल (Amravati District Collector Shelesh Nawal) यांनी माहिती दिली आहे. हा रुग्ण अमरावतीतील पहिलाचं कोरोना बळी ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण अमरावतीत जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, हा रुग्ण ज्या ठिकाणी वास्तव्यास होता, तो परिसर सील करण्यात आला आहे. आतापर्यंत विदर्भात दोन जणांचा कोरोना व्हायरसमुळे बळी गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बळीचा आकडा 27 वर पोहोचला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा - Coronavirus: राजस्थानमध्ये 60 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 191 वर)
A 45-year-old man who passed away on 2nd April in Amravati, Maharashtra has tested positive for #COVID19, in his test report that came today: Amravati District Collector, Shelesh Nawal
— ANI (@ANI) April 4, 2020
प्राप्त माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी 45 वर्षीय रुग्णाला अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळले होते. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला न्यूमोनिया झाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान याच दिवशी या रुग्णाचा मृत्यू झाला होता. आज या रुग्णाचा रिपोर्ट आला असून हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने मृत्यू झालेल्या रुग्ण राहत असलेला हत्तीपुरा परिसर सील केला आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.