मुंबईत एकूण 9 लाख बोगस मतदार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी म्हटले आहे. मुंबई शहरात एकाच व्यक्तीच्या फोटोवर वेगवेगळी नावे, पत्ते असलेले 11-13 मतदार ओळखपत्र आहेत. अशाप्रकारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 15-20 हजार बोगस मतदार असून ही बोगस नावे वगळावी लागतील, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. संजय निरुपम म्हणजे 'परप्रांतीय भटका कुत्रा' ; मनसेचा सोशल मीडियातून पलटवार
माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे मतदार याद्यांची तपासणी केली असता एका व्यक्तीच्या फोटोवर 11-13 मतदान ओळखपत्रं असल्याचे समोर आले. निवडणूक आयोग मतदार यादीचा मसुदा जाहीर करण्यापूर्वी ही बोगस नावे यादीतून काढून टाकण्याची मागणीही संजय निरुपम यांनी केली आहे.
हे आरोप निराधार नसल्याचे सिद्ध करण्यासाठी आज ते या बोगस मतदारांची यादी देणार आहेत. यादी जाहीर झाल्यानंतर त्याचे परिक्षण करुन नियमानुसार त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे. यातील 55 हजार मतदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर 14 हजार 700 दुबार मतदरांची नावे मूळ मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याची माहितीही कुर्वे यांनी दिली.