BMC Budget 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकाने (BMC) 2024- 2025 या आर्थिक वर्षात BEST साठी सार्वजनिक वाहतूक उपक्रमासाठी 800 कोटी रुपयांचे बजेट जाहिर केले आहे. बीएमची चा कारभार यंदाही इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्याकडून बीएमसीचा अर्थसंकल्प सादर केला गेला. बजेटमध्ये बेस्ट बसेसच्या सेवा सुधारित व्हाव्यात या करिता बीएमसी कडून अर्थसंकल्पातून तरतुद केली जाते. (हेही वाचा- मुंबई महानगर पालिकेचा आज सादर होणार अर्थसंकल्प;)
या निधीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास, उपकरणांची खरेदी, कर्जाची परतफेड,नवीन बसेसचे भाडेपट्टे, पगारात सुधाराणा, दैनंदिन खर्च, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली प्रकल्प कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस पेमेंट, ग्रॅच्यूइटी आणि इतर यासह विविध गरजा पूर्ण केल्या जातील पेन्शनधारकांचे दायित्व, तसेच वीज देयके यांसाठी आर्थिक मदत पुरवली जाणार आहे. मुंबई शहारासाठी बेस्ट उपक्रमाच्या 2000 इलेक्ट्रिक बसेसच्या प्रवर्तन प्रकल्पाच्या 2573 कोटी इतक्या खर्चातील एकून वर्धनक्षम तफावत निधीकरिता जागतिक बॅंक आणि राज्य शासनाकडून अनुक्रमे 70 टक्के आणि 25 टक्के इतकी रक्कम बेस्ट उपक्रमास देण्यात येणार आहे.
BMC 2,000 इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी व्यवहार्यता निधी म्हणून अतिरिक्त 128.65 कोटी रुपयांचे योगदान देण्यास तयार आहे.बीएमसीने चालू आर्थिक वर्षात परिवहन विभागासाठी 468.39 कोटी रुपयांचा अंदाजपत्रक खर्च आणि 5.99 कोटी रुपयांचे महसूल उत्पन्न अपेक्षित केले आहे.