Black Magic | (File Photo)

Navi Mumbai Shocker: नवी मुंबईतील (New Mumbai) वाशी (Vashi) परिसरातून अत्यंक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काळ्या जादूच्या (Black Magic) नावाखाली 56 वर्षीय महिलेकडून 78 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, सात आरोपींनी यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने पीडितेकडून 42.08 लाख रुपये किमतीचे 105 तोळे सोने आणि 36.65 लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर पीडितेला अर्धांगवायू झाला. आरोपी पीडितेला पती, मुलगी आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी देत होते. (हेही वाचा -Mumbai Airport Receives Email Threat: मुंबई विमानतळाला टर्मिनल 2 उडवण्याची धमकी; आरोपीकडून पैशांची मागणी)

या सात जणांवर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरेडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाइस आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू कायदा 2013 च्या तरतुदींनुसार आरोप करण्यात आले. मात्र, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

यापूर्वी देखील काळ्या जादूच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आल्या आहेत. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. काळ्या जादूच्या साहाय्याने धनप्राप्ती करून देऊ असं आश्वासन देऊन अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लोक अशा घटनांचा बळी ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृती होणं आवश्यक आहे.