Coronavirus: सहा महिन्याच्या कोरोना मुक्त बाळाला डिस्चार्ज, रत्नागिरी जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर
कोरोना मुक्त बाळाला डिस्चार्ज (Photo Credit: MahaDGIPR)

रुग्ण बरे होऊन घरी जातात तेव्हा रुग्णांसोबत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही त्यांना निरोप देण्यासाठी आलेले कधी पहिले आहे? सध्य परिस्थितीत असेच काहीसे चित्र आज रत्नागिरीच्या एका रुग्णालयात पाहायला मिळाले. कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित म्हणून एका रुग्णालयात 11 दिवस उपचार घेणाऱ्या सहा महिन्याच्या एका बाळाला आज डिस्चार्ज मिळाले. या बाळाला निरोप देण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकाही दारापर्यंत आले. रत्नागिरीच्या साखरतर येथील महिलेला 7 एप्रिल रोजी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महिलेचे नातेवाईक असलेल्या सहा महिन्याच्या बाळाचा अहवाल सकारात्मक आला. हे सहा महिन्याचं आज आपल्या आईच्या कडेवर बसून घरी गेलं. घरी जाण्यासाठी निघालेल्या या चिमुकल्याला रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक स्टाफ आणि इतरांनी टाळ्या वाजवल्या.

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे 811 नवीन रूग्ण जोडले गेले, त्यामुळे कोरोना ग्रस्तांची संख्या 7628 झाली. दरम्यान, कोरोनामुळे आणखी 22 रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात मृत्यूची संख्या 323 वर पोचली आहे. मृतांमध्ये मुंबईचे 13, पुण्याचे 14 आणि मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, धुळे आणि सोलापूर शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दुसरीकडे,रत्नागिरी शहरातील कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या शून्यावर पोहचली.

रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गमधेही आता कोरोनाचा एकही रुगण नाही. असं असलं तरीही या दोन्ही जिल्यातील नागरिकांना लॉकडाउनचा पुढचे आणखी काही दिवस अधिक काळजी घ्यावी लागेल, असं आरोग्य विभागाने  म्हटलं आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 3 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे.