Representational Image (Photo Credits: IANS)

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) अंतिम टप्पा आज, 29 एप्रिल रोजी पार पडत आहे. महाराष्ट्रातील 17 मतदारासंघासह देशात 9 राज्यांतील 71 लोकसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे. 2014 सालच्या निवडणुकीवेळी ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोटाळा झाला झाल्याचा आरोप झाला होता, आता मतदारांच्या बाबतीत घोटाळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पालघर (Palghar) लोकसभा मतदारसंघात तब्बल 56 हजार बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांनी केला आहे.

पालघर लोकसभा मतदार संघात महायुतीचे राजेंद्र गावीत आणि महाआघाडीचे बळीराम जाधव यांच्यात लढत होत आहे. मात्र सुरेखा सुरेश पाटील यांचे नाव 68 वेळा, तर सुरेखा सुरेश जाधव यांचे नाव 48 वेळा मतदार यादीत आल्याने इथे बोगस मतदार उभे केल्याची शंका वाढली. अशा प्रकारे पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई, नालासोपारा आणि बोईसरमध्ये तब्बल 56 हजार बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांनी केला आहे.

(हेही वाचा: मुंबईच्या मतदार यादीत 9 लाख बोगस मतदार- संजय निरुपम)

फाटक यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत संबंधित बोगस मतदारांबाबत योग्य पावले उचलून कारवाई करावी असे जिल्हा निवडणूक प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान निवडणूक प्रशासनाने येथील मतदानावर विशेष लक्ष ठेवले जाण्याचे आश्वासन दिले आहे.