Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून रेड झोन म्हणून घोषित केलेल्या मुंबईत (Mumbai) हा आकडा 7500 च्या घरात जाऊन पोहोचला आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. धारावीत आज 42 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या परिसरातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 632 वर पोहोचली आहे. तर एकूण 20 रुग्ण दगावल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

देशात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन हा आकडा आता 42,836 वर जाऊन पोहोचला आहे. यातील 11,762 रुग्ण बरे झाले असून 1389 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात गेल्या 24 तासांत देशात 2573 नवे रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात 12,974 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 548 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहेत. तर 2115 रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लॉकडाउनच्या (Lockdown) काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत कलम 188 एकूण 92 हजार 161 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 18 हजार 216 जणांना अटक केली आहे.