कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 3 हजार 390 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 7 हजार 958 पैकी 50 हजार 978 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. तसेच लॉकडाउनचा पाचवा टप्पा 30 जूनपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 3 लाख 20 हजार 922 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 9 हजार 195 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 62 हजार 379 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा Coronavirus: चिंताजनक! अंधेरी-जोगेश्वरी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट; एका दिवसात 166 नवे रुग्णांची नोंद
एएनआयचे ट्वीट-
3390 #COVID19 cases & 120 deaths reported in Maharashtra in the last 24 hours. Total number of cases in the state is now at 107958, including 50978 discharged, and 3950 deaths: Maharashtra Health Department pic.twitter.com/723p1gLXDs
— ANI (@ANI) June 14, 2020
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत आहे.