Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) येथील MIDC भागात राहणाऱ्या एका 31 वर्षीय डेंटिस्टने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. स्वाती शिगवान (Swati Shigwan) असे या आत्महत्या केलेल्या डेंटिस्टचे नाव आहे. (Dr. Payal Tadvi Suicide Case: पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींना तूर्तास जामीन नाही, मुंबई हायकोर्टाची सुनावणी पुढील आठवड्यात)

ग्रीन फिल्ड बिल्डिंग येथे राहणाऱ्या या डेंटिस्टने गळफास घेत आत्महत्या केली. ही डॉक्टर महिला मुळची औरंगाबादची असून घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोट आढळली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. (पुणे: मुलांची हत्या आणि आईची आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा! वडिलांकडूनच दोन्ही चिमुरडींवर बलात्कार)

ANI Tweet:

घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. (पुणे: पोटच्या 3 मुलांची हत्या करून आईने केली गळफास घेऊन आत्महत्या)

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नायर रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर पायल तडवी हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. रुग्णालयातीलच सिनियर्स डॉक्टर्सकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून पायलने आपले जीवन संपवले होते. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई हायकोर्टात हा खटला सुरु आहे.