Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय, वैद्यकिय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. सद्य स्थिती पाहात राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 4200 वर जाऊन पोहोचली आहे. नागपूर मध्ये 3 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 76 वर जाऊन पोहोचली आहे. हा आकडाा खूपच चिंताजनक असून लोकांनी विनाकारण घराबाहेर पडून असा सल्ला वारंवार प्रशासनाकडून दिला जात आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे 4200 रुग्ण आहेत. त्यापैकी 507 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले असून 3470 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनाने एकूण 223 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हानिहाय यादी

भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 17,265 वर पोहोचली असून 2547 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 543 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर जगभरात एकूण 24,06,910 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 1,65,059 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.