New Mumbai Shocking: नवी मुंबईतील (New Mumbai) महिलेवर दोन वर्षांपासून वारंवार बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला बृहन्मुंबई महापालिकेत (BMC) नोकरीला आहे. या प्रकरणातील आरोपी हा अहमदनगर (Ahmednagar) येथील असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कामोठे पोलीस ठाण्यातील (Kamote Police Station) एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पुरुष आणि महिलेमध्ये मैत्री झाली होती. त्यानंतर आरोपीने ऑक्टोबर 2022 ते या वर्षी जानेवारी दरम्यान तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तसेच आरोपीने तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिला ब्लॉकमेल केले. (हेही वाचा - Sex Racket In Pune: थाई महिलेद्वारे अपार्टमेंटमध्ये चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी दोन पीडितांची केली सुटका)
याप्रकरणी शनिवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक केलेली नाही, असं अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. (Mumbai News: 22 वर्षीय तरुणीची राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या, गोरेगाव येथील घटना)
दरम्यान, प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, 2018 ते 2022 या कालावधीत मुंबईत नोंदवलेल्या एकूण बलात्काराच्या घटनांपैकी 61% घटना या POCSO कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या होत्या. 2022 मध्ये शहर पोलिसांकडून 3,360 पॉक्सो कायद्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यात आली होती, त्यापैकी वर्षाच्या अखेरीस एकूण 2,438 प्रकरणे (73%) प्रलंबित होती, असे अहवालात दिसून आले.