Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Thane: ठाणे शहरातील एका 36 वर्षीय महिलेची एका फेसबुकवर मित्राने (Facebook Friend) 22.67 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली. पोलिसांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये, एका व्यक्तीने ऑनलाइन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या महिलेला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली.

जेव्हा ते नियमितपणे ऑनलाइन चॅटिंग करू लागले तेव्हा त्या व्यक्तीने तिला सांगितले की, त्याला त्याच्या आईच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचं सांगितलं. त्यामुळे महिलेने त्याला पैसे पाठवले. महिलेच्या म्हणण्यानुसार, असे अनेक वेळा घडले. (हेही वाचा - Mumbai Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, न्यायालयाकडून आरोपीला पोलिस कोठडी)

या महिलेने फेसबुक मित्राला 7,25,000 रुपये तसेच 15,42,688 रुपयांचे दागिनेही दिले. जेव्हा तिने त्याला पैसे परत देण्यास सांगितले तेव्हा तो तिला टाळू लागला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

वर्तक नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 406 अन्वये आरोपीविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वीदेखील अशा घटना अनेकवेळा घडल्या आहेत. त्यामुळे फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया साधनांवरून मैत्री करताना योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे.