
कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी 3 मे पर्यंत देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व वैद्यकिय, शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. हे करत असताना अनेक डॉक्टर्स, नसर्से आणि पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बातम्या आपण याआधी ऐकल्या आहेतच. मात्र यांच्याप्रमाणेच लोकांना या परिस्थितीची माहिती पुरविणा-यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रसारमाध्यमांच्या जवळपास 30 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती IANS ने दिली आहे. यामध्ये वृत्तवाहिनेचे रिपोर्टसचा समावेश अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे याबाबत अधिक माहिती देत ही केवळ सद्य परिस्थितीतील प्राप्त माहितीनुसार मिळालेली संख्या असून ही संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र पोलिस खात्यातील 8 अधिकारी तर 29 अन्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मुंबई महापालिकेने प्रसारमाध्यमांच्या कर्मचा-यांसाठी विशेष स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जेथे 30 पत्रकारांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra COVID- 19 Update: महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा ४००० च्या पुढे; २२३ जणांचा मृत्यु - Watch Video
या सर्वांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले असून अन्य पत्रकार तसेच कॅमेरामन चे रिपोर्टस येणे बाकी आहे असे सांगण्यात येत आहे. ही समख्या खूपच धक्कादायक असून पत्रकार बांधव जे ऑनफिल्ड काम करत आहेत त्यांनी स्वत:ची योग्य ती काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.