महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 4 हजार 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 47 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 6 हजार 931 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 77 हजार 453 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 4 लाख 73 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 14 हजार 894 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 71 हजार 697 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- BMC: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 2 हजार 210 कोरोनाबाधित; दिवसभरात आणखी 11 नव्या रुग्णांची नोंद
राजेश टोपे यांचे ट्विट-
राज्यात आज 4841कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 147741 अशी झाली आहे. आज नवीन 3661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 77453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 63343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 25, 2020
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी 3 हजार 661 रुग्णांना घरी सोडण्यात आहे. यामुळे राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 77 हजार 453 वर पोहचली आहे. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार 844 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 52 टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, असेही ते म्हणाले आहेत.