Bangladeshi Arrested in Maharashtra: महाराष्ट्र पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर तीन जिल्ह्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 16 बांगलादेशी नागरिकांना अटक (Bangladeshi Arrested in Maharashtra) केली आहे. एका विशेष कारवाईचा भाग म्हणून, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) स्थानिक पोलिसांच्या मदतीने गेल्या चार दिवसांत मुंबई, नाशिक, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथून नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. (Maharashtra: महाराष्ट्रातील नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना अटक)
बनावट कागदपत्रे वापरून आधार कार्ड बनवले
आरोपींमध्ये आठ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यांनी बनावट कागदपत्रे वापरून आधार कार्ड बनवले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फॉरेनर्स ॲक्ट आणि इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार पाच गुन्हे दाखल केले आहेत. एटीएसने विशेष मोहिमेअंतर्गत गेल्या महिन्यात 19 प्रकरणांमध्ये 43 बांगलादेशी नागरिकांना अटक केली.
कोणतेही वैध दस्तऐवज आढळले नाही
एका गुप्त माहितीच्या आधारे, ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी मंगळवारी माणकोली भागातील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथे असलेल्या एका गोदामावर छापा टाकला आणि तेथे बांगलादेशातील सात जण काम करत असल्याचे नारपोली पोलिसांनी सांगितले. आरोपींचे वय 26 वर्षांच्या आरपास आहे. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही वैध दस्तऐवज आढळले नाहीत.
पोलिसांनी एफआयआर नोंदवला
असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याचे उल्लंधनकरून अवैध पद्धतीने राहिल्याच्या कलमांखाली त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.