Leopard Attack On Boy: महाराष्ट्रातील इगतपूरी तालुक्यातील उंबरकोन येथे 9 मे रोजी 11 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या मुलाचा उपचारा दरम्यान रविवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोक पसरला आहे. या घटनेनंतर वनविभागाकडून बचावकार्य सुरु झाले. त्यात बिबट्याने सहा वन अधिकाऱ्यांना आणि ग्रामस्थांवर हल्ला केला. (हेही वाचा- बापरे! जुन्नरमध्ये थेट रुग्णालयात शिरला बिबट्या; हल्ल्यात वनरक्षक जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपूरी येथील रहिवासी असलेला प्रवीण सारुक्ते (वय 11) यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याने 9 मे गुरुवारी रोजी प्रवीणवर बिबट्याने हल्ला केला होता. हे पाहताच ग्रामस्थांनी त्याला वाचवले आणि थेट नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु जीवनाशी लढाई देत प्रवीणचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. प्रवीण आई वडिलांसोबत शेतात काम करत होता. शेताच्या लगत एक मोठे जंगल आहे तेथून बिबट्या आला आणि त्याने थेट प्रवीणवर हल्ला केला. शेतात उपस्थित गावकऱ्यांनी कसेबसे त्याला हल्ल्यातून वाचवले.
विशेष म्हणजे ज्या बिबट्याने हल्ला केला त्याला अद्यापही पकडण्यात यश नाही. वनविभागाच्या १३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही बिबट्या मोकाच फिरत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिक येथील पथकाला पाचारण करण्यात आले आहे. बिबट्याचे मोकाटपणे फिरणे हे आणखी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी बिबट्याला लवकर जेरबंद करा अशी विनंती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. बिबट्याने ग्रावकऱ्यांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.