Reservation: मराठासह जाट, राजपूत आणि ठाकूर समाजालाही 10% आरक्षण देण्यात यावे- रामदास आठवले
Ramdas Athawale (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात आरक्षण मिळावे, यासाठी अनेक समाज आंदोलन करत आहेत. यातच मराठा (Marathas) समाजासह जाट (Jats), राजपूत (Rajputs) आणि ठाकूर (Thakurs) समाजालाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संसदेत केली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाज लढत आहे. तसेच हरियाणात जाट, राजस्थानमध्ये राजपूत आणि उत्तर प्रदेशात ठाकूर समाजालाही आरक्षण हवे आहे. तसेच 2021 ची जनगणना जातीच्या आधारे झाली पाहिजे, असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

मराठा, जाट, राजपूत आणि ठाकूर यांना अनुक्रमे महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात आरक्षण हवे आहे. क्षत्रिय समुदायाची मोठी लोकसंख्या आहे. ज्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्यात आले तसेच त्यांनाही आरक्षण देण्यात यावे. एवढेच नव्हेतर, अनुसूचित जाती/ जमातीला बढतीमध्ये आरक्षण मिळावे. तसेच 2021 ची जनगणना जातीच्या आधारे झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी आहे. हे देखील वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण सुनावणी साठी सर्वोच्च न्यायलयाने जारी केलं 8 मार्च पासूनचं 10 दिवसांचं वेळापत्रक; केंद्र सरकार ही मांडणार बाजू

एएनआयचे ट्विट-

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.