यंदाच्या गणेशोत्सवात मोदकांना असा द्या हेल्दी ट्विस्ट !
गणेशोत्सवासाठी खास मोोदक (फाईल फोटो)

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती म्हटलं की मोदक हे आलेच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोदक अगदी आवडीने खाततात. सणावाराला तर त्यावर भलताच ताव मारला जातो. पण यामुळे गोड खाण्यावर नियंत्रण राहत नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने  ते फारसे चांगले नाही. पण आपल्या या आवडीच्या मोदकांना हेल्दी ट्विस्ट दिला तर...? पाहुया काही हेल्दी टेस्टी मोदक रेसिपीज...

अंजीर मोदक

सुकामेव्यातील इतर पदार्थांपेक्षा अंजीर अधिक फायदेशीर आहेत. त्यामुळे अंजीर मोदकात घातल्याने मोदकाला हेल्दी ट्विस्ट मिळेल. त्यासाठी एका पॅनमध्ये अंजीर हलकेसे भाजून घ्यावे. त्यानंतर त्यात गुळ, वेलची पावडर आणि अंजीरचे काप घालून त्याचे मिश्रण बनवा. या मिश्रणाचे मोदक बनवा.

कोकोनट मोदक

कोकोनट मोदक बनवण्यासाठी एक साचा घ्या आणि त्यात खोबरं, गुळ आणि वेलची यांचे मिश्रण भरा. याचा स्वाद अधिक वाढवण्यासाठी काजू, मनुके आणि बदाम देखील घालू शकता.

खजूर मोदक

खजूर मोदक बनवण्यासाठी एक कप बी काढलेले खजूर घ्या. ते ग्रँडरमधून वाटून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडेसे तूप गरम करा आणि यात खजूर घालून १० मिनिटे शिजवा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे मोदक बनवा. स्वाद वाढवण्यासाठी यात तुम्ही बदाम आणि काजू देखील घालू शकता.

ड्राय फ्रुड्स मोदक

खजूर किंवा अंजीर आवडत नसल्यास इतर ड्राय फ्रुड्सचे मोदक तुम्ही बनवू शकता. यासाठी बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड आणि किसलेओलं खोबरं घ्या. सर्व समान प्रमाणात घेऊन यात गुळ मिसळा आणि ते मिश्रण गरम करा. त्यानंतर या मिश्रणाचे मोदक बनवा.

स्टीम मोदक

स्टीम मोदक बनवण्यासाठी २ कप किसलेलं खोबरं घ्या. त्यात अर्धा चमचा गुळ, वेलची पावडर आणि तांदळाचे पीठ घाला. या मिश्रणाचे स्टीम मोदक बनवा. हे मोदक पचण्यास हलके असतात आणि चवीलाही उत्तम असतात.